Ads

अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील

चंद्रपूर दि.10: चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यामध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. मुंबई-पुण्यातील खेळाडूंप्रमाणेच भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकीक प्राप्त करतील व चंद्रपूरचा मान वाढवतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Due to the state-of-the-art badminton hall, the players of the district will achieve international standards*
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे, चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, अनिरुद्ध जोशी,सचिव जुवेलजी चांदेकर, तालुका क्रीडा अधिकारी नंदू आवारी, जवाहर पंजाबी, आदित्य गलांडे, विक्रांत पटवर्धन, जयश्री देवकर, रंजना सेवतकर, खेळाडू व पालकांची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्री. गिरीश चांडक यांनी बॅडमिंटन स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. मागील वर्षी बॅडमिंटन हॉलच्या सोलार सुविधेसाठी 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुढील स्पर्धेपूर्वी हॉलसाठी जनसेट (जनरेटर) बसविण्यात येईल. जिल्ह्यातील खेळाडूंना सोयीसुविधांची उणीव भासू नये यादृष्टीनेच मोठ्या शहरांच्या ताकदीचा अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल चंद्रपूरमध्ये उभारला गेला आहे. भविष्याचा वेध घेत देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी 2036 च्या ऑलिंपिकमध्ये अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबरीने भारतही पदक जिंकणारा देश असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला सार्थ ठरविण्यात चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही, हा संकल्प करण्यात आला आहे.’

*चंद्रपूरमध्ये प्रगत क्रीडा सुविधा:*
चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. बल्लारपूर स्टेडियम मध्येही लवकरच वातानुकूलित हॉल तयार होणार आहे. तसेच म्हाडाच्या 16 एकर जागेवर तब्बल 137 कोटी रुपये खर्चून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 10 कोर्ट असलेला भव्य वातानुकूलित बॅडमिंटन हॉल तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने चंद्रपूरमध्ये वेस्टर्न झोन स्पर्धा आयोजित करण्यास तयारी दर्शविली आहे, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब ठरेल. क्रीडा क्षेत्रात जगाच्या बरोबरीने पुढे राहण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कारण मैदानावर उतरणाऱ्यांचे मन, बुद्धी आणि शरीर सदैव निरोगी राहते आणि त्यातूनच समाजाला उत्तम आरोग्याचा लाभ होतो.

चंद्रपूरमध्ये उत्तमोत्तम क्रीडा सुविधा तयार करण्यात आल्या याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंडर-19 स्पर्धेचे आयोजन मोठ्या शहराऐवजी बल्लारपूर तालुका स्टेडियमवर करण्यात आले. या स्पर्धेत देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेनंतर खेळाडूंनी मिळालेल्या उत्तम सुविधांचे कौतुक करत अभिमानाची भावना व्यक्त केली. याशिवाय विद्यापीठाची इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धाही यशस्वीपणे पार पडली. खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 57 कोटीं रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हाडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 137 कोटींचे भव्य स्टेडियम उभारले जात आहे.आर्चरीसाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
वन अकादमी येथे 15 कोटी रुपये खर्ची करून स्टेडियम याशिवाय पोलीस फुटबॉल ग्राउंडवरही 15 कोटींचे स्टेडियम उभारण्यात येत आहे, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

*जिल्ह्याच्या क्रीडा सुविधांवर अभिमान*
केंद्रीय मंत्री ना. रक्षा खडसे यांना सैनिकी शाळेतील स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सेंटर दाखविण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, पूर्वी जेव्हा एखाद्या राज्यातील सुविधा पाहायची, तेव्हा महाराष्ट्र मागे असल्याची भावना यायची. मात्र, आता अभिमानाने सांगू शकते की 28 राज्यांच्या बैठकीत बसताना माझ्या मनात ‘हम भी कुछ कम नाही’ असा आत्मविश्वास असेल.’ त्यांचे हे वक्तव्य प्रेरणा देणारे होते. असेही आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करावे. दिल्लीचे तख्त राखायचे असेल तर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment