(प्रशांत गेडाम)सिंदेवाही--सिंदेवाही शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस स्टेशन सिंदेवाहीच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शाळेसमोर, बसस्थानक परिसर, बाजार चौक, शिवाजी चौक तसेच इतर प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.
Sindewahi police take drastic action; 25 minor drivers detained, vehicles handed over after understanding parents
या मोहिमेदरम्यान वाहन चालविताना आढळलेल्या २५ अल्पवयीन दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे आणण्यात आले. त्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर पालकांकडून जबाबदारीची हमी घेऊन वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी सिंदेवाही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका. अशा प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
सिंदेवाही पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0 comments:
Post a Comment