जावेद शेख/ प्रतिनिधी भद्रावती :-
पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा सुमठाणा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध कोंबड बाजारावर भद्रावती पोलिसांनी रविवारी धाड टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेला जुगार उधळून लावला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून रोख रक्कम, जिवंत व जखमी कोंबडे असा एकूण ३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Bhadravati police raid illegal chicken market; Four gamblers arrested, items including chickens and cash seized
दिनांक २६ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार व त्यांचे सहकारी टाऊन बीट परिसरात पेट्रोलिंग करत असताना, मौजा सुमठाणा येथील शेतशिवारात काही व्यक्ती कोंबड्यांच्या झुंजीवर हार-जीतची पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळी अचानक छापा टाकला.
पोलिसांचे पथक पाहताच जुगार खेळणारे काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
गणेश मनोहर फटाले (वय ३६, रा. श्रीनगर, विजासन रोड, भद्रावती)
राजा मोठी शेट्टी (वय ३९, रा. मोहबाळा, ता. भद्रावती)
अतुल ज्ञानेश्वर पिंपळकर (वय ३१, रा. मासळ, ता. भद्रावती)
अशोक शंकर कावळे (वय ६५, रा. दाताळा, जि. चंद्रपूर)
आरोपींच्या अंगझडतीमध्ये १ हजार ९६० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून पाच कोंबडे (दोन जखमी व तीन जिवंत) ताब्यात घेण्यात आले. हे कोंबडे पोलीस ठाण्यात आणून त्यांचा लिलाव करण्यात आला असता १ हजार ५०० रुपये प्राप्त झाले. अशा प्रकारे एकूण ३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, सपोनि मिश्रा, पोलीस अंमलदार खुशाल, जितेंद्र फराते, प्रेम बावनकर आणि योगेश घुगे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment