वरोऱ्यात विदेशी दारूची तस्करी उघड; १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

वरोरा प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा परिसरात अवैध विदेशी दारूच्या वाहतुकी विरोधात पोलिसांनी कारवाई करत रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला. रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी बोर्डा चौक ते आनंदवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ८ हजार रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या मुद्देमालासह १९२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
Smuggling of foreign liquor exposed in Varora; Goods worth Rs 1.08 lakh seized!
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात विनोद नथुजी वल्लादे (वय ३६) आणि समीर आरिफ शेख (वय २०), दोघेही रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूमध्ये १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या १९२ बाटल्यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी दारासिंग संगतसिंग दुधानी, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा, याचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
या प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक १०५७/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभाग वरोरा पथकाने केली. परिसरातील अवैध दारू वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष वेधले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment