Ads
ब्रम्हपूरीत नाभिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात कळकळीत बंद 










चंद्रपूर जिल्ह्यातील तालूका ब्रम्हपूरीत महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक युवा संघटना शाखा ब्रम्हपूरी येथे दिनांक 14/8/2019 ला सर्व सलून दुकानदारांनी कळकळीत बंद पाडून शासन दरबारी न्याय मागण्यासाठी एस. डी. एम. कार्यालय जावून निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर शाखांचे जिल्हाअध्यक्ष दिनेश एकवनकर संपादक दिनचर्या यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी सुर्यवंशी यांच्या घरी छोटे खानी सभा घेण्यात आली. नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज, संत सेना महाराज, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.  समाजातील ज्येष्ठ नागरिक श्री चन्ने, मेश्राम, फुलबांधे, महादेव शेन्डे, दत्तूजी मेश्राम, दिपक येडमे, किशोर लांजेवार, सोमेश्वर दाने, निलेश दाने, यानी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केवळ राम सुर्यवंशी यांनी केले. हा बंद यशस्वी करण्यासाठी राजेश खळसिंगे. विठ्ठल खळसिंगे, धनंजय पगाडे, लक्ष्मीकांत फुलबांधे, विनोद मेश्राम, पुरुषोत्तम दाने, प्रदीप सुर्यवंशी, मयूर मेश्राम, विलासराव सुर्यवंशी, गणेश मेंडूलकर, आकाश लांजेवार, पंकज सुर्यवंशी, चेतन वानखेडे, प्रदीप कुडवे, मोहन सुर्यवंशी, संजय, अमित, विशाल रविंद्र किशोर, आंनद, जितू 
. मार्गदर्शक अशोक सालोटकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी सर्व नाभिक सलून दुकानदारांनी यात बंद ठेवून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम यांनी केले. तर आभार सचिन मेश्राम यांनी केले. शेवटी सर्व नाभिक समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेवून या एकदिवसीय बंदची सांगता करण्यात आली. 


   

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment