Ads

राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.





राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.

खासदार बाळू धानोरकर यांच्यासह त्यांच्या हल्लेखोर आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पत्रकार संघाची मागणी.

चंद्रपूर :-
दिनचर्या न्युज

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकांवर राजकीय व अवैध धंदेवाईक यांचे हल्ले दिवसे दिवस वाढत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्हा सरचिटणिस तथा साप्ताहीक भुमीपूत्राची हाक (न्युज पोर्टल) चे संपादक राजू कुकडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दैनिक सकाळ पोर्टलच्या फेसबुक वरील झालेल्या ट्रोल संदर्भात बातमी आपल्या न्युज पोर्टलवर दि.१७ जानेवारी ला प्रकाशित केली होती. त्या बातमीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात कुठलेही वक्तव्य नसतांना व फेसबुकवर झालेल्या ट्रोलचा संदर्भ घेत ती बातमी प्रकाशित झाली असतांना खासदार बाळु धानोरकरांनी भूमिपूत्राची हात न्यजु पोर्टलचे प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांना फोनवरून बातमी अशी का लिहिली? असा प्रश्न करून तुम्हा दोघांनाही चंद्रपूरला भेटतो म्हणून सांगीतले. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी संपादक राजु कुकडे यांना फोनवर भेटण्याची व तुम्ही कुठे आहात म्हणून माहिती घेतली होती.

काल दिनांक १८/०१/२०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोग जवळ राजू कुकडे हे आपल्या चारचाकी वाहनांत बसत असतांनाच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला पण ते आपला जीव वाचविण्यासाठी हॉटेल राजयोगमध्ये घुसले असता आरोपी तेथेही येवन "साल्या आमचे बाळूभाऊची बदनामी करतोस काय? असे म्हणत मारहाण सुरू केली व त्यांचे हात पकडून तु आता बाळू भाऊ च्या घरी चल म्हणत खिचत होते. यावेळी त्यांचे हाताला गंभीर दुखापत झाली. व हल्ले खोर आरोपी पसार झाले.

हल्लेखोर हे खासदार बाळू धानोरकरांचे गुंड आहे. त्यामुळे वरोरा पोलीस स्टेशनमध्ये राजु कुकडे यांनी तक्रार दिली. पण पोलिसांनी केवळ कलम ३२३.५०४, ५०६ अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला. या हल्ल्यामागे खासदार धानोरकर मुख्य सुत्रधार असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या हल्लेखोर गुंडावर पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे, पण जिल्हयात अवैध दारूचे व्यवसाय करणाऱ्या व या धंदयातून पोलीस प्रशासनाला हप्ते देवून कोटयावधी रूपयाची कमाई करणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांचेवर पोलीस कारवाई करेल अशी शक्यता नाही, पण पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारचे अवैध धंदे मोठया प्रमाणात वाढवुन गुंडाराज निर्माण करणाऱ्या खासदार बाळू धानोरकरांनी ज्या पद्धतीने अनेक पत्रकांना धमक्या देवून व राजू कुकडे सारख्या निर्भीड संपादकावर गुंडाकरवी हल्ला करून सत्तेचा दुरूपयोग केला, त्या व्यक्तींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डिजीजल मेडीया असोशिएशन सह सर्वच पत्रकार संघातर्फे आपल्या प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशा प्रकारचा इशारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केला.

या निवेदनाच्या प्रती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, देशाचे ग्रूहमंत्री यांच्यासह काँग्रेस कमेटी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राज्याचे काँग्रेस कमेटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलीया, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय ग्रूह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना देण्यात आल्या यामुळे आता खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर रोष निर्माण होऊन त्यांच्यावर कारवाई होणार का ? याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment