सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या धोरणाची
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्राच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना हक्काचे घरकुल मिळण्यासाठी नगर परिषदेकडून तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती देत लवकरच अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकुल मिळणार असल्याची ग्वाही भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली आहे.
स्थानिक प्रभाग क्र.१२ मधील गवराळा येथील चुटकी बहुद्देशीय संस्था या ठिकाणी दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता विशेष सभा घेण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नियोजन सभापती चंदू खारकर,नगर सेविका प्रतिभा निमकर,सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणुसमारे,राहुल सोनटक्के यांची उपस्थिती होती.सदरच्या जनजागृती मोहिमेबाबत काही विरोधक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत असून यात कोणताही राजकीय हेतू नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून संबधित योजनेचा लाभ घेण्याकरिता योग्य तो पाठपुरावा करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फेत ११ सप्टेंबर २०१९ अन्वये शासन निर्णय पारीत झालेला असून त्यात स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीतील जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करून अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्याबाबत शासनाने १७ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशान्वये पट्टे वाटपाच्या संदर्भात मार्गदर्शन सुचना निश्चित केल्या आहेत़. त्यानुसार भद्रावती न.प. स्तरावरून कार्यवाही सुरु केली आहे.सभेत घोषीत, अघोषीत झोपडपट्या लाभ सर्वसामान्य नागरिकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनच्या निर्णयानुसार सरकारी जागेवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला आहे़. त्यानुसार नगर परिषदेच्या हद्दीतील अतिक्रमण धारकांची माहीती जमा करण्यासाठी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती या विशेष सभेत उपस्थित नागरिकांना देण्यात आली आहे.त्याचबरोबर शासनाच्या या महत्वकांक्षी धोरणाचा लाभ घेण्यासाठी लाभार्त्यांनी येत्या दहा दिवसांत आवश्यक असलेला कागदोपत्री पाठपुरावा नगर परिषदेकडे जमा करावा असे आवाहन या सभेत करण्यात आले.यावेळी प्रभाग १२ मधील शेकडो नागरिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment