Ads

*आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर परदेशी शिक्षणासाठी अनिकेतला मिळाली ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती*

चंद्रपुर :-  आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर चंद्रपूर येथील अनिकेत  बहादुरे या विद्यार्थ्याला परदेशी शिक्षण घेण्यासाठी ५० लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. आता हा विद्यार्थी अमेरिकतील प्रतिष्ठित विद्यापिठात सिव्हील इंजिनिअर अभ्यासक्रम पुर्ण करु शकणार आहे. Aniket got Rs 50 lakh scholarship for foreign education after efforts of MLA Kishore Jorgewar
 अनिकेत  बहादुरे या चंद्रपूरातील विद्यार्थ्याने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र १० महिने उलटुनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. परिणामी विद्यापीठाच्या सत्राची २४ ऑगस्ट हि तारीख जवळ येऊ लागल्याने त्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांनी प्रधान सचिव व संबंधित अधिकाऱ्यांची भेटही घेतली. सदर मागणीसाठी त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर अनिकेत बहादुरे याला तीन वर्षाकरिता ५० लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती मंजुर झाली आहे. अंकित याला सिव्हील इंजिअर बनायच असुन शिष्यवृत्ती मंजुर झाल्यामुळे अमेरिकेतील कैलीफोर्निया येथील विद्यापीठात सदर अभ्यासक्रम पुर्ण करता येणार आहे. शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबदत अनिकेत  याने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. विद्यार्थाना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असतात चंद्रपुरातील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावा यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. आज सदर विद्यार्थाला शिष्यवृत्ती मिळवून देता आली याचे समाधान व्यक्त करत अनिकेतला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा  दिल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment