Ads

आरोग्य दूतांची फरपट, १०२ अँबुलन्स चालकांचा चार महिन्यापासून पगार रखडला ....

सवाली :-कोरोनाच्या काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारे अँबुलन्स चालक आता मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या चार महिन्यापासून वेतन रखडलेल्या या अँबुलन्स चालक दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडला आहे आरोग्य दूत म्हणून सन्मान करण्यात आलेल्या अँबुलन्स चालकांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे.The fury of health envoys, the salary of 102 ambulance drivers has been stopped for four months....
चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ हेल्पलाइन असलेल्या रुग्णवाहिका हे गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बाजावत आहे मात्र गेल्या चार महिन्यापासून त्यांना एकही रुपयांच वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न अंबुलन्स चालकासमोर उभा आहे. ही व्यथा कोण्या एकट्या चालकाची नव्हे तर जिल्ह्यातील आहे.

सर्वच आरोग्य केंद्रात | १०२ क्रमांक हेल्पलाईन असलेल्या रुग्णवाहिका चालकांची आहे. कारण गेल्या चार महिन्यापासून एकाही चालकाला एक रुपयाचाही पगार मिळालेला नाही.
जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत असून यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहून संबंधित कंपनीने या चालकांचे वेतन तात्काळ आदा करण्यात यावे न केल्यास कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात यावं, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे. दरम्यान, याच आरोग्य दूतांच्या हाती खऱ्या अर्थाने मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांचे आयुष्य असते. अपघातापासून ते अगदी छोट्या-मोठ्या कारणासाठी सुद्धा हेच अँबुलन्स चालक आपल्या जीवाची पर्वा न करता ड्युटी बजावत असतात. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा पगार सुद्धा त्यांना दिला जात नसेल, तर मग याला जबाबदार कोण याचा विचार नक्कीच व्हायला हवा.
असे मत ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
दिपावली ला पगार न झाल्यास मुलाना व कुटुंबातील व्यक्तीवर मोठा संकट उभे राहणारणार असल्याचे चित्र दिसून येत आहे मा ना सुधिरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक मत्स्यपालन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भेटून ग्रा. प. सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी 102 वाहन चालक यांची जाणीव करून अशा वाहण ठेकेदाराला काळ्या यादित टाकुन 24 तास आरोग्य सेवा देणाऱ्या 102 रुग्न वाहीका चालकांना त्वरीत मानधन अदा करण्यात यावे अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment