राजुरा : 27 ऑक्टोम्बरला राजुरा शहरात एक इसम - खुलेआम कंबरेला देशी कट्टा लावून फिरत होता, याबाबत राजुरा पोलिसांनी त्या इसमाला अटक केली आहे. Arm act
दहशत पसरविण्यासाठी आज अनेकजण विविध युक्त्या लढवीत आहे मात्र त्या युक्त्या पोलिसांसमोर निकामी ठरत आहे. Desi Katta अशीचं एक युक्ती राजुरा शहरात न्यू व्हेरा इंग्लिश हायस्कुल जवळ एकाने करण्याचा प्रयत्न केला. 19 वर्षीय युवक लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल एक गावठी बनावट असलेला देशी कट्टा व 4 जिवंत काडतुसे घेऊन फिरत होता. live cartridges पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ लबज्योत सिंग ला ताब्यात घेत त्याच्याजवळील देशी कट्टा व 4 जिवंत काडतुसे जप्त केली. Chandrapur police
आरोपिकडून एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, crime news सदर आरोपी विरूद्ध अप. क. ४३४ / २०२२ हत्यार कायदा सहकलम १३५ मु.पो. का अन्वये कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा पवार यांचे नेतृत्वात ठाणेदार संतोष दरेकर यांचे मार्गदर्शनात पथकातील सफी, खुशाल टेकाम पो.हवा. रविंद्र नक्कनवार, पो. हवा किशोर तुमराम, पो. शि. महेश बोलगोडवार, पोशि, संदिप बरडकर, पोशि. तिरूपती जाधव यांनी केली.
0 comments:
Post a Comment