Ads

अमृत महा आवास अभियान2022-23 अंतर्गत सरपंच तथा घरकुल लाभार्थ्यांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते सत्कार.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यात घरकुल योजनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच तथा उत्कृष्ट घरकुल लाभार्थ्यांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभागृहात  पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार प्रतिभा धानोरकर, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, कृषी अधिकारी सुशांत गाडेवार सरपंच नयन जांभुळे  चंदनखेडा  आदी मान्यवर उपस्थित होते.Sarpanch and gharkul beneficiaries felicitated by MLA Pratibha Dhanorkar under Amrit Maha Awas Abhiyan 2022-23.
 सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा राज्य शासनाने देखील स्वीकार केला आहे. त्यासाठी पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सरपंच तथा सचिव यांना यावेळी आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट घरकुल तयार करणाऱ्या लाभार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव तथा गावकरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment