Ads

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, भद्रावती तालुक्यातील मांगली येथील घटना.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याच्या गाईच्या कळपातील एका गाईवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. सदर घटना दिनांक 23 रोज सोमवारला तालुक्यातील मांगली गावाजवळील नवरगाव रिठातील जंगल शिवारात घडली. Cow killed in tiger attack,
सदर गाय हि गाभण होती. या गाईच्या मृत्यूमुळे गाय मालकाचे 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगली येथील गुराखी नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी गायींना चारण्यासाठी सदर शिवारात घेऊन गेला होता. गाई चरत असताना दुपारच्या वेळी दबा धरून असलेल्या वाघाने विनोद पायघन यांच्या गाईवर हल्ला केला. यात सदर गाईचा जागीच मृत्यू झाला. सदर गाय ही गाभण असल्यामुळे विनोद पायघन यांचे 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळविण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. सदर गाईच्या मृत्युमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी विनोद पायघन यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment