Ads

डॉ अभिलाषाताई गावतूरे ह्यांच्या समर्थनार्थ उसळला जनसागर.

बल्लारपूर :-प्रचार तोफा हळूहळू थंडावत असतानाच एक दिवसा अगोदर भव्य दिव्य असा रोड शो काढून डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांच्या छातीत अक्षरशः धडकी भरवली आहे .
A huge crowd rose in support of Dr. Abhilashatai Gavature.
एकीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी पवन कल्याण सारख्या स्टार प्रचारकाला आणूनही त्यांना पाहिजे तशी गर्दी खेचता आली नाही तर दुसरीकडे डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या रोड शो च्या माध्यमातून जनता स्वयं स्फूर्तीने रस्त्यावर उतरून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला त्यामुळे या रॅलीची एकच चर्चा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आहे.
ढोल ताश्याच्या गजर, आदिवासी नृत्य, व डॉली चायवाला Dolly Chaiwala हे रॅली चे विशेष आकर्षण ठरले.
या रॅली ची सुरुवात वस्ती परिसरातील गांधी चौक येथून सुरवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे या रॅलीची सांगता झाशी राणी चौकामध्ये एक मोठ्या जाहीर सभेमध्ये करण्यात आली.
या सभेला सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रचारासाठी आलेले डॉली चायवाला Dolly Chaiwala, गोंडवानाचे गणपत नैताम सामाजिक कार्यकर्ते रितेश बोरकर आरपीआय गवई गटाचे धीरज वाळके प्रकृती पाटील मॅडम प्रियाताई झांबरे कारव्याचे विनोद सीडाम ताहीर भाई हुसेन व विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment