Ads

चंद्रपुरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त!

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून ५०० रुपयांच्या रंगीत छायांकित नोटांसह तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Counterfeit Currency Factory Busted in Chandrapur!
१० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये काही इसम अवैधरित्या ५०० रुपयांच्या रंगीत छायांकित नोटा तयार करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला.
छापा टाकल्यावर फ्लॅटला कुलूप असल्याचे आढळले. त्यानंतर फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉल (रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांना बोलावून चौकशी करण्यात आली. त्यांनी सदर फ्लॅट मागील एक महिन्यापासून मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना भाड्याने दिल्याचे सांगितले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत फ्लॅटचे लॉक तोडून झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान बेडरूममध्ये ठेवलेल्या १० बॉक्समध्ये भारतीय चलनासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या रंगीत छायांकित नोटा, तसेच EPSON कंपनीचा कलर प्रिंटर व इतर साहित्य असा एकूण ९१,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत शुभम दिनेश नागर (वय २६, रा. पंचेड, तहसील रतलाम, जिल्हा रतलाम, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याने फसवणुकीच्या उद्देशाने या बनावट नोटा तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १९६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(२), ३१८(३), ३३६(२), ३३६(३) आणि १८२(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment