Ads

जलसंपदा व ग्रामविकास विभागातील वेतनत्रुटी , पदोनत्ती स्तर कमीकरणे व पदनामात बदल संदर्भात मंत्रीस्तरावर चर्चा.

चंद्रपूर :- राज्यातील लिपिक संवर्गाच्या न्याय व हक्कासाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मंत्रालयात महत्वाच्या बैठका पडल्या. 
Ministerial-level discussions regarding pay anomalies, reduction in promotion levels, and changes in designations within the Water Resources and Rural Development Departments.
दिनांक ५ मार्च २०२६ रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लिपिकांची वेतन त्रुटी दूर करून पदनमात बदल व पदोनत्ती स्तर कमी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गोदावरी मराठवाडा विकास मंडळ मधील अधिकारी व कर्मचारी शासनाकडे कायम ठेवून स्वायत्त धोरण रद्द करण्याबाबत संघटनेने सविस्तर भूमिका मांडली.

बैठकीत प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव डॉ . संजय बेलसरे, सहसचिव सुदिन गायकवाड तसेच संघटनेचे अध्यक्ष अशोक डहाळे, कार्याध्यक्ष शरद बिरादार व राज्य सचिव आनंद भिसे उपस्थित होते. यावेळी लिपिक संवर्गाच्या पदनामात बदल व पदोन्नतीस्तर कमी करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर दिनांक ६ मार्च २०२६ रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागाची बैठक झाली. या बैठकीत कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक पद एकत्र करून त्याचे पदनाम "विकास अधिकारी" करण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील , ग्रामविकास मंत्री जयकुमार व आमदार अभिमन्यू पवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय होईल, असे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment