Ads

भद्रावतीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

भद्रावती | प्रतिनिधी। जावेद शेख
भद्रावती शहराजवळील चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतकरी हॉटेलच्या मागील शेतशिवारात रविवारी (दि. २८ जून) सायंकाळी सुमारे ४.२५ वाजता एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती डायल ११२ वर प्राप्त होताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.Dead body of a strange man found in Bhadravat;  Police appeal to citizens to identify themselves
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५२ वर्षे असून उंची सुमारे १६५ सें.मी. आहे. त्याचा रंग काळा-सावळा असून शरीरयष्टी अत्यंत हडकुळी व खंगलेली आहे. पांढरे-काळे केस व दाढी असून अंगात गडद निळ्या रंगाचा लाल-पांढऱ्या चौकोनी डिझाइनचा शर्ट, ग्रे रंगाची मळकट पँट, कंबरेला वॉटर फायटर कंपनीचा रेनकोट तसेच पायात RICKY कंपनीच्या स्लिपर आढळून आल्या आहेत.
प्राथमिक पाहणीत संबंधित व्यक्ती भिकारी अथवा मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेतील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने भद्रावती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५४/२०२६, कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथील शवगृहात ओळख पटेपर्यंत सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा आपल्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीशी वर्णन जुळत असल्यास नागरिकांनी तातडीने भद्रावती पोलीस स्टेशन अथवा सपोनि विरेंद्र केदारे (मो. ८३८१०५०९७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment