चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत रुग्णालयातील चोरीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा (वय ३०, रा. शामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने जुनोना रोडवरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून अतुल राणा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ₹५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात आरोपीचा पोलीस ठाणे चंद्रपूर शहर अप. क्र. ९४२/२०२६ या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. सदर प्रकरणात कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहितेअंतर्गत रुग्णालयातील चोरीचा गुन्हा दाखल आहे.
आरोपीची सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला पोलीस ठाणे चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईमुळे रुग्णालयातील चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
कारवाई पथक :
उपविभाग चंद्रपूर पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
0 comments:
Post a Comment