Ads

भद्रावतीत पहाटे रेती तस्करांवर पोलिसांचा छापा!

भद्रावती प्रतिनिधी/जावेद शेख: मांगली नाल्याकडून भद्रावतीकडे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर भद्रावती पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत १ ब्रास रेती, ट्रॅक्टर आणि लोखंडी ट्रॉली असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Police raid on sand smugglers in Bhadravati early in the morning!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४० ते ५.२० वाजताच्या दरम्यान मौजा जमघट हॉटेलच्या मागील गौतमनगर, भद्रावतीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मांगली नाल्याकडून भद्रावतीच्या दिशेने लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टरमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भारत वसंता बोढेकर (वय २४, रा. मांगली, ता. भद्रावती) आणि समीर बंडू चौधरी (वय २४, रा. मांगली, ता. भद्रावती) यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १ ब्रास रेती (किंमत ५ हजार रुपये), लाल रंगाचा महिंद्रा YUVO 585 DI ट्रॅक्टर (५ लाख ५० हजार रुपये) आणि लाल रंगाची लोखंडी ट्रॉली (७० हजार रुपये) असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, प्रशांत शेंदरे, पो.अं. खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, मपोअं. मोनाली गारघाटे व पोलीस स्टेशन भद्रावतीच्या पथकाने ही कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment