माळमाथा परिसरात लांडग्याची दहशत : शेतकऱ्यांत भितीचे वातावरण
खबरबात, गणेश जैन , धुळे
बळसाणे - साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वाघापूर येथे सहा मेंढ्या ठार व तीन जखमी या घटनेला काही दिवस उलटत नाही व शेतकऱ्यांना यागोष्टीचा विसर पडत नाही तितक्याच इंदवे येथे दोन लांडग्यांनी हल्ला चढविला
माळमाथा परिसरात लांडग्याचा उपद्रव वाढला आहे रात्री अपरात्री जंगलातील , वाड्या , कोठड्यातील शेळ्या मेंढ्या लांडग्याकडून फस्त केल्या जात आहे त्यामुळे वाघापूर व इंदवे गावासह माळमाथा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे वनविभागाने या लांडग्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती साक्री तालुक्यातील माळमाथा भागात जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने झाडझुडप्यांमुळे कुत्रे , कोल्हे , लांडगे , तरस या हिंस्र प्राण्यांबरोबरच ससे , घोरपड याही प्राण्यांचा वावर असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे या प्राण्यांचे खाद्य प्रामुख्याने कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या , कोवळे गवत प्रसंगी शाडूची माती देखील खावी लागते त्याचप्रमाणे लांडगे , कोल्हे , ससा , घोरपडी यांना देखील खाद्य म्हणून फस्त करतात यावर्षी माळमाथा परिसरात पावसाने ओढ दिल्याने भागात खाद्याची व पाण्याची कमतरता भासू लागल्याने लांडग्याचा मनुष्य वस्तीत वावर वाढला आहे लांडग्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्यावर हल्ले करून त्या फस्त करण्याचा सपाटा लावला आहे साधारणपणे आठ ते दहा लांडग्यांची टोळीच गावभागाच्या परिसरातून रात्री व दिवसादेखील फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले *नुकतेच इंदवे येथील शेतकरी नंदू युवराज भदाणे या शेतकऱ्याची बंद वाडग्यात मध्यरात्री साधारणतः दोन ते अडीच वाजता घुसून १७ शेळ्या , मेंढ्यावर हल्ला चढवीत जागेवर च ठार केल्या याबाबत वनपाल अवसरमल , वनरक्षक जेलवाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून रितसर पंचनामा केला लांडग्याचा मुगमास असल्याचे साक्री चे वनक्षेत्र पाल पी.जे.पाटील यांना सांगून सदर शेतकऱ्यास भरपाई मिळेल असे नमूद केले आहे* या कळपातील लांडगे माणसाच्या अंगावर धावून येत आहेत अर्थिक नुकसानी बरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होवू शकतो विशेषतः म्हणजे लहानली मुले , महिला यांच्यात घबराट पसरली आहे
0 comments:
Post a Comment