चंद्रपूर :- बातमीच्या चित्रीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्यात गेलेल्या झी मीडियाचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि त्यांच्या सहका-याला २ पोलीस कर्मचा-यांनी गुहेगाराप्रमाणे वागणूक देत जबर मारहाण केली. २८ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेविषयी माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे. झी मीडिया प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी स्वतःचा परिचय दिल्यावरही हा प्रकार घडला. मारहाणीतून आपली कशीबशी सुटका करून घेत राऊत यांनी पोलीस निरीक्षक वणी यांचा कक्ष गाठला. मात्र तरीही २ मुजोर-बेलगाम कर्मचा-यांची अरेरावी सुरूच राहिली. पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यावरच अत्याचारी पोलीस कर्मचारी मागे सरले. या घटनेने पत्रकार सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या घटनेचा निषेध आणि २ दोषी पोलीस कर्मचा-यांवर कठोर कारवाईची मागणी करत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या एका शिष्टमंडळाने माध्यम प्रतिनिधींसमवेत चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांची भेट घेत त्यांना एक निवेदन सादर केले. जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेत पत्रकार बंधूनी वणी येथील घटनेविषयी चिंता व्यक्त करत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत भावना कळविण्याची विनंती केली. पत्रकारांचे संरक्षण करत चौथ्या स्तंभाला बळकट करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याने शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला. याप्रसंगी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्यासह प्रमोद काकडे, महेंद्र ठेमस्कर, प्रवीण बतकी, जितेंद्र मशारकर, अमित वेल्हेकर, गणेश अडलूर , आशीष अम्बाडे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केला वणी येथील पत्रकार मारहाणीचा निषेध

0 comments:
Post a Comment