पुसेसावळी/राजीव पिसाल:
पुसेसावळी ग्रामपंचायतीकडून मुख्य बाजारपेठतील दत्त चाैकात अती उच्च दाबाचे चार सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत,त्यामुळे राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशिल असणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावामध्ये असणारी मोठी व्यापारी बाजारपेठेत त्याचबरोबर अनेक छोटे- मोठे अपघात, चोरी वाहतुक-कोंडी या बाबी नित्यानेच घडत असल्यामुळे यावरती चांगलाच चाप बसला आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन याचे फुटेज दुरक्षेत्र पुसेसावळी येथे कार्यन्वित करण्यात आले आहेत.
यामुळे या परिसरातील घडणाऱ्या अनुचित प्रकारावर आळा बसेल, तसेच बुधवारच्या बाजारा दिवशी अनेक महिलांचे दागिने, लोकांचे मोबईल, पाकिटे मारली जायची यावरती नक्कीच अंकुश राहिल,त्यामुळे बाजरा दिवशी होणार्या चोरीच्या घटनानचे प्रमाणात कमी होईल.त्यामुळे पुसेसावळी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत व्यापारी वर्ग व ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
पुसेसावळी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय खरोखरच चांगला असून दत्त चाैकात सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे पोलीस यंत्रणेला तपास कामात व गुन्हेगारांना शोधण्यास मदत होणार आहे, यामुळे पोलीस यंत्रणेला ही सजक राहावे लागणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक
श्री.विलास कुबडे (दुरक्षेत्र पुसेसावळी).
ग्रामपंचायत स्व निधीतून पुसेसावळीतील दत्त चौकातील मुख्य ठिकाणी सी.सी टिव्ही कॅमेरे बसवुन पुसेसावळीच्या सुरक्षिततेबाबत ग्रामपंचायतीने एक ठोस निर्णय घेतला आहे, तरी येणार्या काळामध्येही पुसेसावळी गावच्या विकासाच्या दृष्टिने प्रयत्न केले जातील.
सरपंच
सौ. मंगलताई पवार,(पुसेसावळी).
पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या माध्यामातून सी.सी टिव्ही सारखे नवनवीन उपक्रम राबवल्यामुळे लोकांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्या पूर्ण करुन येणार्या काळामध्ये गावच्या विकासाकामांवर भर दिला जाईल.
उपसरपंच
श्री.सुर्यकांत कदम (पुसेसावळी).
0 comments:
Post a Comment