श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळा
नागपूर/ अरूण कराळे :श्री संत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे दरवर्षी प्रमाणे माघ् पौर्णिमा उत्साहाच्या पावन पर्वावर सोमवार १८ फेब्रुवारी व मंगळवार १९ फेब्रुवारी रोजी मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, मातंग समाज मेळावा व सामाजिक सत्कार सोहळा संस्थेच्या वतीने व माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे.
श्री संत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा, तालुका नरखेड) येथे आयोजित १८ फेब्रुवारी रोजी दुपारी संस्थान परिसरात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. तर सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सामुदायिक प्रार्थना होईल. नंतर रामभाऊ निमकर यांचे शहनाई वादन तर हरिनाम व सामाजिक किर्तन ह .भ.प. रामचंद्र महाराज काळबांडे यांचे होईल. गितगायन मुक्ताताई, श्रीराम जोंधळकर, भक्तीमय संगीत संजय तिळके, सुगम गायन पुजा किशोर वानखेडे, वंदना खंडारे अन्य समाजातील कलावंताचे प्रबोधन, गायन करण्यात येईल.
१९ फेब्रुवारीला दुपारी १ ते २ मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, समाज मेळावा व सामाजिक सत्कारमुर्तीचे स्वागत समारोहाचे औचित्य साधून अरुण गायकवाड यांच्या शहनाई वादनासह महाराष्ट्र शासन समाजभुषन पुरस्कृत संजय ठोसर,शंकर ठोसर प्रस्तुत स्वररंग म्युजिकल ग्रुप नागपूरच्या वतीने अभंगवाणीचे सादरीकरण मनवर ठोसरसह क्रिष्णा गायकवाड यांचे राहील. गोपालकाल्याचे किर्तन ह .भ .प .रामचंद्र काळबांडे, संगीतमय समाज प्रबोधन अशोक वानखेडे व संच अंजनसिंग जि.अमरावती यांचे राहील.
मातंग समाजातील इच्छुक वधु-वरांनी आपली नावे आयोजक समीतीच्या श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ यांचेकडे रविवार १० फेब्रुवारी पर्यंत निःशुल्क नोंद नोंदविली जाईल. तसेच मातंग समाज बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा. व जास्तीतजास्त संखने उपस्थित राहवे असे आवाहन श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बालकदास खंडारे, उपाध्यक्ष अशोक डोके, सचिव नत्थु अडागळे, सहसचिव रामदास खडसे, कोषाध्यक्ष अरुण गायकवाड, संपर्क सचिव संजय ठोसर यांनी केले आहे .
संस्थान परिसर श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ या मंगलमय कार्यक्रमास लाभणारे सत्कारमुर्ती माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने,माजी जि.प.सदस्य डॉ.आनंद खडसे, जि.प.उपाध्यक्ष शरद डोनेकर, जि .प. माजी अध्यक्ष बंडोपत उमरकर, जि.प.शिक्षण सभापती उकेश चव्हाण, पं.स. सभापती राजेंद्र हरणे, मुक्तापूर पेठ सरपंचा द्वारकाबाई नाखले, जेष्ठ समाजसेवक डॉ .अशोक कांबळे, लहानु इंगळे, महादेव जाधव, केशव कांबळे, रविंद्र खडसे, सुनिल सोनवाने, साहेबराव वानखेडेसह पदाधिकारी व सदस्यगण यांच्या उपस्थितीत मंगलमय विवाह सोहळा कार्यक्रम होणार आहे.
0 comments:
Post a Comment