Ads

बल्लारपुर पोलीसांनी वेकोली परीसरात जब्त केला लाखोंचा दारुसाठा. वाहनांसह आरोपींना अटक ,

बल्लारपुर पोलीसांनी वेकोली परीसरात जब्त केला लाखोंचा दारुसाठा. वाहनांसह आरोपींना अटक ,

बल्लारपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगीरी

बल्लारपूर प्रतिनिधी :-

बल्लारपुर पोलीसांना दि. १५.१२.१९ चे रात्री ०१:४५
वा.चे सुमारास आरोपी नामे १) अनवर अब्बास शेख २) सागर लांबोळे दोघेही iराहणार आंबेडकर
वार्ड, बल्लारशाह यांनी देशी दारु चा साठा आणला व त्या दारुची विल्हेवाट लावीत असल्याच्या
खात्रीशिर बातमीवरुन बल्लारशाह येथील वेकोली परीसरात पोलीसांनी छापा मारून कार्यवाही केली असता आरोपी अनवर अब्बास शेख, सागर लांबोळे व त्यांच्या एक साथीदारांला अटक करण्यांत आली. ४२ खरडयाचे
खोक्यात प्रत्येकी ९० एम एल देशी दारुने भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत, प्रवरानगर, रॉकेट सत्रा
कंपनीच्या सिलबंद ४,२०० निपा घटनास्थळी सापडल्या.
घेराव घालीत असतांना पोलीसांची चाहुल लागताच तिन्ही आरोपीं पोलीसांना पाहुन पळुन गेले मात्र पोलिसांनी त्यांना
पाठलाग करून पकडले. त्यांनी पकडलेल्या दारूसाठय़ाची किंमत ८,४०,००० /- रु. आखण्यात आली

सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी सा., पो. उपविभागीय अधिकारी
श्री स्वप्नील जाधव, सा.,पोलीस निरीक्षक श्री शिवलाल भगत सा यांचे मार्गदर्शनांत सहा.पोलीस
निरीक्षक गायकवाड, पो.हवा सुनील कांबळे, नापोशि.मनोज पिदुरकर, सुधाकर
वरघणे,नापोशि.संतोष दंडेवार,पोशि.शरदकुडे, पो.शि. शेखर माथनकर, पोशि.अजय हेडाऊ यांनी
केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी बल्लारपूर जनतेला आव्हान केले आहे की, चंद्रपुर जिल्हा हा दारुबंदी असून
आपले आजूबाजला कोठेही कोणिही दारुसाठा बाळगुन अथवा विक्री करतांना दिसला किंव्हा दारू बाबत काही माहिती
असल्यास
त्वरीत बल्लारपूर पोलिसांना फोन कंरावा. यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
०७१७२-२४०३२७ वर किंवा पोलिस नियंत्रण कक्ष येथे १०० नंबर वर माहीती दयावी.आपण
दिलेली माहीती गुप्त ठेवण्यात येईल आणि दोशींवर कडक कारवाई करण्यात येईल

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment