Ads

महाकाली मंदिराच्‍या सौंदर्यीकरणाच्‍या कामाला त्‍वरित सुरुवात करावी*



महाकाली मंदिराच्‍या सौंदर्यीकरणाच्‍या कामाला त्‍वरित सुरुवात करावी 
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांचे निर्देश
 
चंद्रपूर जिल्‍हयाचे आराध्‍य दैवत असलेल्‍या माता महाकाली देवस्‍थानाच्‍या सोंदर्यीकरणासाठी व संबंधीत विकासकामांसाठी मंजुर 60 कोटी रु. निधी अंतर्गत करावयाच्‍या विकासकामांवर देण्‍यात आलेली स्‍थगिती उठविण्‍यात आलेली असुन संबंधीत विकासकामे तातडीने सुरु करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी दिले.
दि. 17 डिसें. रोजी विधानभवन नागपूर येथे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासंबंधी आढावा बैठक घेतली. या बैठकीत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने महाकाली मंदीराच्‍या सौंदर्यीकरणाच्‍या कामाला तातडीने सुरुवात करण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयाशी संबंधीत विविध विषयांकडे मुख्‍यमंत्र्याचे लक्ष वेधले. महाकाली मंदिराच्‍या सौंदर्यीकरणासाठी मी अर्थमंत्री असताना 60 कोटी रु. निधी मंजुर करण्‍यात आला होता. या संदर्भात दिलेली स्‍थगिती त्‍वरित उठविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. चांदा ते बांदा या रिसोर्स बेस्‍ड या योजनेच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्‍हयांच्‍या विकासासाठी विशेष प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. या योजनेला 3 वर्षे मुदत वाढ देण्‍यात यावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 18 जुन 2019 रोजी अर्थसंकल्‍पात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावीत जिल्‍हयांसाठी रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने तीन वर्षात 500 रु. निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा करण्‍यात आली होती. यासाठी तातडीने निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी यावेळी आ. मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वाकांक्षी सिंचन प्रकल्‍प असलेला हुमन सिंचन प्रकल्‍प काही अडचणींमुळे रखडला आहे. या संदर्भात उच्‍चस्‍तरीय बैठक घेवुन अडचणी दुर करण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. तसेच चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्‍वे उडडाण पुलाच्‍या बांधकामासाठी तातडीने आवश्‍यक निधी उपलब्‍ध करण्‍याची मागणी त्‍यांनी केली.

या सर्व विषयांसंदर्भात संबंधीत विभागांकडुन माहीती मागवुन  त्‍वरित सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी यावेळी दिले. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment