Ads

दुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह

*चंद्रपूर कोरोना अपडेट*



*दुर्गापूर येथील एक नागरिक कोरोना पॉझिटीव्ह*
चंद्रपूर :दिनचर्या न्युज -
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, पंचशील नगर या परिसरातील एक 55 वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिले आहे.
दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून 13 मे रोजी एक युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इंस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ( संस्थात्मक अलगीकरण ) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून 18 मे रोजी कुटुंबातील सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. आज ६ पैकी ४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या चार अहवालात 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे.
या सहा पैकी आणखी दोन अहवाल प्रतीक्षेत आहे. 55 वर्षीय व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.

दिनचर्या न्युज
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment