जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्यांदाच प्रसूती; कन्यारत्नाचे आगमन!

जिबगाव : जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थापनेपासून प्रथमच यशस्वी प्रसूती झाल्याने परिसरात आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्पर प्रयत्नांतून एका महिलेची यशस्वी प्रसूती झाली असून, कन्यारत्नाचे आगमन झाले आहे.

First-time delivery at Jibgaon Primary Health Center; Arrival of a daughter!

जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यापासून आजपर्यंत येथे एकही प्रसूती झाली नव्हती. मात्र, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रथमच प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. रजनी पुरुषोत्तम किनेकऱ, रा. चाकलपेठ, मुरखळा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांना कन्यारत्न प्राप्त झाले.

या प्रसूतीसाठी डॉ. झरकर मॅडम, नर्स पुनकटवार तसेच आशा वर्कर बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तत्परता, सेवाभाव आणि समन्वयामुळे प्रसूती यशस्वी झाल्याने आरोग्य केंद्राच्या कार्यात महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे.

या यशाबद्दल राकेश गोलेपल्लीवार, माजी ग्रामपंचायत सदस्य, जिबगाव तथा सामाजिक कार्यकर्ता, ता. सावली, जि. चंद्रपूर यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध होत असून, भविष्यातही नागरिकांना तत्पर, दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही पहिली यशस्वी प्रसूती ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरली असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment