Ads

मद्यप्रेमींसाठी खुशखबर! आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...

मद्यप्रेमींसाठी खुशखबर! आजपासून बिअरबारमधून होणार मद्यविक्री, पण ही आहे अट...

नागपूर, 27 मे: लॉकडाऊनमध्ये मद्यप्रेमीसाठी खुशखबर आहे. नागपुरात बिअरबारमधून मद्यविक्रीची डिलिव्हरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनानं केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची बिअरबारला परवानगी दिली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिक्षा होती.

हेही वाचा..

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी ही परवानगी दिली. मात्र, मंगळवारी या आदेशाची प्रत उशीरा मिळाल्याने आज बुधवारपासून बिअरबारमधून मद्यनिक्री होणार आहे. मात्र, बार मालकाला सर्व नियमाचे पालन करावे लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये नवीन साठा मागवता येणार नाही.

दरम्यान, नागपूर शहरात जवळपास 300 तर ग्रामीण भागात 125 बिअर बार आहेत. या बार मालकांना तसेच तिथे कां करणाऱ्यांना बार उघडण्याची प्रतिक्षा होती. बहुतांश बारमध्ये बिअर आणि मद्याचा मोठा साठा आहे. हा साठा एक्स्पायर होतो की काय, अशी भीती संचालकांना होती. त्यामुळे वाईनशॉपच्या धर्तीवर बारमधून मद्यविक्री पार्सल स्वरुपात सुरू करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती.

काय आहेत नियम व अटी...

-ग्रामीण भागातील बिअर बार संचालकांना त्यांच्या काऊंटरवरूनच ग्राहकांना केवळ सीलबंद पार्सल सुविधा देण्याची परवानगी असेल.

-ही परवानगी बीरमधील साठा संपेपर्यंत व लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत मर्यादीत असेल.

- लॉकडाऊनच्या कालावधीत बार मालकाला मद्याचा नवीन साठा मागवता येणार नाही.

- मद्यविक्री करत असताना बार संचालकांना सर्व नियम व अटींचं पालन करावं लागणार आहे

हेही वाचा..

दुसरीकडे, नागपूर शहरात सहा परिसरातील प्रतिबंधित निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सतरंजीपुरा भागात तीन, मंगळवारी, आशिनगर, गांधीबाग प्रत्येकी एक परिसरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

28 दिवसांपर्यंत नवीन रुग्ण न आढल्यामुळे निर्बंध हटवण्याची निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश काढले आहेत.

दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment