Ads

राजुरा येथील पापा जाधव हत्याकांड प्रकरणात सहावा आरोपी गजाआड.

राजुरा, दि.२० सप्टेंबर :
सोमनाथपूर वार्डातील पापा जाधव यांच्या गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. Sixth Accused Arrested in Papa Jadhav Murder Case in Rajura
सध्या पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून आता या हत्याकांडात सहावा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.या आरोपीचा हत्याकांडात सहभाग असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांना सहावा आरोपी गवासल्याने गोळीबाराचे तार आणखी कुठपर्यंत पोहचले आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. पापा जाधव हे नारळ पाणी विक्रेत्याकडे बसले असताना त्यांच्यावर दुचाकीने आलेल्या दोघांनी जवळून गोळीबार केला. या गोळीबारात त्यांनी तीन फायर केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर करन बाविस्कर व करन मेकेलवार या दोघांनी पोलिसांसोबत शरणागती पत्करली. पोलिसांच्या तपासात परवेश शेख, कार्तिक खामणकर व सौरभ खामणकर या आरोपींच्या मुसक्या आवळ्या. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक बाबीचा उलघडा झाला. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोडीपींनी जंगलात सराव केला. सध्या पाचही आरोपी न्यायालयीन कोठडी आहे व त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत मोक्का कारवाई करण्यात आली. दरम्यान आयपीएस सुशांत कुमार यांनी तपासाची सूत्र हाती घेतली असता या हत्याकांडात सहावा आरोपी पोलिसांच्या रडारवर आला असून अंकित बापूजी मासिरकर वय २४ वर्ष, चुनाला याला ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता पाच दिवसच पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहावा आरोपी गवसल्याने हत्याकांडातील गुंतागुंती वाढली आहे. आरोपाच्या पोलिस कोठडी मध्ये आणखी काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment