Ads

युवा युथ। फौंडेशन च्या वतीने शामनागर येथील गरजू तृतीयपंथी लोकांना महिना भर चे किराणा राशन वाटप!


युवा युथ। फौंडेशन च्या वतीने शामनागर येथील गरजू तृतीयपंथी लोकांना महिना भर चे किराणा राशन देण्यात आले,

चंद्रपूर :दिनचर्या न्युज
आज आम्ही युवा युथ। फौंडेशन च्या वतीने शामनागर येथील गरजू तृतीयपंथी लोकांना महिना भर चे किराणा राशन देण्यात आले,लॉकडॉऊन च्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले,त्यात तृतीयपंथी भगिनी नि आपली व्यथा आमच्या समोर मांडली की त्यांचा उदरनिर्वाह ट्रेन,लग्नकार्य,वाढदिवस,या मधून मिळणाऱ्या नेग वर होत असतो,लॉकडॉउन मूळे कुठेही शुभकार्य होत नाही आहे त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे,..समाजकार्य महाविद्यालया च्या डॉ जयश्री कापसे गावंडे यांनी या गरजू लोकांची व्यथा आमच्या समोर मांडली.. त्यामुळे आम्ही सगळे आम्ही युवा चे संयोजक त्यांना भेटायला गेलो व त्यांची समस्या जाणून घेतली..आज त्यांना मदत करू शकलो,शामनागर परिसरातील ,व लालपेठ भगतसिंग चौक येथे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथी लोकांना या गरजेच्या वस्तू देण्यात आल्या ज्यात तांदूळ,पीठ,डाळ,व तेल आहे,या उपक्रमाला सर्व संयोजकांनी सढळ हाताने मदत केली यावेळी सुबोध कासुलकर,साजिद कुरेशी,अश्विनी खोब्रागडे,आशिष मुंधडा,ऍड शकिर मलक,प्रफुल मेश्राम,गिरीश नंदूरकर, विलास माथनकर महेंद्र राजूरकर व इतर सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment