Ads

जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी केली तर, अनेक गबाळ बाहेर येण्याची शक्यता!




जिल्हा ग्रंथालय अधिकारी, यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी केली तर, अनेक गबाळ बाहेर येण्याची शक्यता!
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय हे ज्ञानदानाचे धडे व सामान्य नागरिकाचे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे स्त्रोत माहिती प्राप्त होण्यासाठी शासनाने जिल्हयासह ग्रामीण भागातील गावात ग्रंथालय( वाचनालय) शासनाच्या निधीतून देण्यात आलेली असली तरी, अनेक गावातील वाचनालयाची दैन्यावस्था असून जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी आपल्या स्वार्थासाठी हीत संबंध जोपासत अनेक ग्रंथालय कडून मोह माया साधून त्यांना वर्षाच्या निधीतून सावळा गोंधळ झाल्याचे दिसून येऊ शकते. ग्रंथालय(वाचनालय) तयार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम धाब्यावर ठेवून अनेक ग्रंथालयाची परवानगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडून देण्यात आल्याचे समोर येत आहे. काही ग्रंथालयात शासनाचा वर्षाचा निधी मिळतो म्हणून वाचनालय खुले केल्याचे पाहण्यास मिळते. बऱ्याच या ग्रंथालयांमध्ये वाचनालयाची खोटी नोंद घेऊन, दिखाऊ सभासद, खोटे वावचर बनवून निधी हि "मांजरासारखे डोळे मिटून दूध पीत असल्याचे" निदर्शनास आले आहे. यातूनच या अधिकाऱ्यांनी अनेक मोठी मोहमाया जमावल्याची चर्चा असून या अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी केली तर यांचे सर्व गबाळ बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत.
जिल्हा ग्रंथालयात आलेल्या सामान्य निधीचा यांनी कुठे कुठे व कशासाठी आतापर्यंत खर्च केला याची चौकशी केली, या संदर्भाची माहिती जिल्हयातील एका लोकप्रतिनिधींनी याच कार्यालयात मागीतली होती. मात्र त्यांची दिशाभूल करणारी माहिती दिल्या बद्दलची चर्चा याच कार्यालयातून केली जात आहे.
तसेच हा अधिकारी अनेक महिने जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी असलेल्या वसंतभवन येथे बरेच महिने राहून आपले खोटे घरभाडे भत्ता शासना कडून बेवज घेतला गेला आहे. यासंदर्भात सुध्दा चौकशी केली तर याचे मोठे सोंग बाहेर येण्याची शक्यता आहे. 
आतातर बदली झाल्याचे सांगून 'सौ चुव्हे खाखे बिल्ली भुर्र' होणार त्याआधी या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची नागरिक मागणी आहे. 

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment