सहाव्या वर्गातील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

विसापूर : बल्लारपूर - चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेतील सहाव्या वर्गातील विद्यार्थ्याचा गुरूवार ( दि. ८ ) रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान अचानक मृत्यू झाला. ही घटना शाळेतच घडल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. यावर शाळा व्यवस्थापन काहीच बोलत नाही, असा आरोप पालकांनी केला. Suspicious death of a sixth grade student
जीवन विलास झरेकर ( वय - १२ ) वर्षे ,रा.खांबाडा ता.राजुरा जि.चंद्रपूर असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
विलास झरेकर यांनी मुलगा जीवन याला चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात घेऊन गेला होता. उपचार करून त्याला चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावरील सन्मित्र सैनिक शाळेत हसतखेळत सोडले.ते राजुरा तालुक्यातील खांबाडा गावात पोहचले. दरम्यान शाळेतून त्याला तुमच्या मुलाची प्रकृती बरी नाही, असा एका शिक्षकाचा त्याला फोन आला. ते तडक शाळेत निघून आले.तेव्हा शाळा व्यवस्थापनाने जीवन ला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेल्याचे सांगण्यात आले. तेथे मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले.
हा प्रकार जीवन च्या नातेवाईकांना संशयास्पद वाटत असल्याचा आरोप वडील विलास झरेकर यांनी व्यक्त केला. यावर शाळा व्यवस्थापन नेमके कारण स्पष्ट करत नसल्याने जीवन च्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याच्या मृत्यू नेमका कशाने झाला, याचा उलगडा होणार आहे. या संशयास्पद विद्यार्थ्याच्या मृत्यू पुढील तपास चंद्रपूर येथील रामनगर पोलीस करत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment