​भद्रावती पोलिसांची कारवाई: बेलोरा शेत शिवारात जुगारावर धाड; ५ आरोपींना अटक, २ पसार; २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावतीी: जावेद शेख
भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेलोरा गावच्या शेतशिवारात बाभळीच्या झाडाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकून पाच जुगारींना रंगेहाथ पकडले, तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईत रोख रकमेसह चार सायकली (दुचाकी) आणि ५२ ताश पत्ते असा एकूण ₹२,६३,३७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
Bhadravati Police Action:
Raid on gambling in Belora Shet Shivara; 5 accused arrested, 2 absconding; Property worth Rs. 2.63 lakh seized
दिनांक ०३/१०/२०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मा. सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस पथक  पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. प्रशांत शेंदरे ,पो.हवा. गोपाळ आतकुलवार, पो.हवा. देवानंद डुकरे, मपोअं मोनाली हे खाजगी वाहनाने गस्त घालत असताना मुखबिराकडून गुप्त माहिती मिळाली की, बेलोरा येथील शेतशिवारात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पैशांची बाजी लावून ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळला जात आहे.  
​पोलीस पथकाने तात्काळ दोन पंचांसमक्ष छापा टाकला. घटनास्थळावरून ५ जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले, तर २ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.  
​अटक करण्यात आलेले आरोपी:
​१. गणेश दिनेश भोयर (वय ३१, रा. वार्ड क्र. ६, माजरी, तह
भद्रावती)
२. निखील चंद्रकांत बोंडे (वय ३५, रा. कुचना कॉलनी, तह. भद्रावती)
३. उदय राजेन्द्र वैद्य (वय २१, रा. बेलोरा, तह. भद्रावती)
४. प्रणीत यशवंत मत्ते (वय ३१, रा. बेलोरा, तह. भद्रावती)
५. अतुल गजानन कुळमेथे (वय ३८, रा. माजरी वार्ड क्र. ६, तह. भद्रावती)  
​पसार झालेले आरोपी (शोध सुरू):
​१. मनीष सातपुते (रा. कुचना, तह. भद्रावती)
२. स्वप्नील पिदुरकर (रा. किलोनी, तह. भद्रावती)  
​जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
​अंगझडती व जुगाराच्या डावावरील नगदी: ₹३,२७०/-  ​ताश पत्ते: ₹१००/- किमतीचे  
​वाहने (दुचाकी):
​टी.व्ही.एस. जुपीटर (MH 04 CY 6077) – ₹६५,०००/-  
​पल्सर (MH 34 CL 3923)₹८०,०००/-शाईन १२५ (MH 34 CB 1018)– ₹५५,०००/-  
​सीबी शाईन (MH 34 BT 4820) – ₹६०,०००/-  
​एकूण जप्त मुद्देमाल: ₹२,६३,३७०/-  
​कायदेशीर कारवाई:
​सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा (म.जु.का.) कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादी पो.हवा. प्रशांत पुंडलिक शेंदरे पो.स्टे. भद्रावती यांच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.j
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment