Ads

गोवंश अवैध वाहतुकीवर पोलिसांचा दणका!

चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत २६ गोवंशांसह आयशर ट्रक व मोबाईल असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.Police crackdown on illegal cattle trafficking!
दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.४० ते ७.४० वाजेदरम्यान सावरकर चौक, पोलीस मुख्यालयासमोर, चंद्रपूर येथे ही कारवाई करण्यात आली. अवैध गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक क्रमांक MH-34-T-3211 पोलिसांनी ताब्यात घेतला.
कारवाईदरम्यान प्रशांत बालाजी जुमनाके (वय ३०, व्यवसाय चालक, रा. वार्ड क्र. ४, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) याला अटक/निष्पन्न करण्यात आले आहे. तर मुन्ना शेख (रा. गडचांदूर, ता. कोरपना) हा पाहिजे आरोपी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
२०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, ५ लाख २० हजार रुपये किमतीचे २६ गोवंश (२४ गाई व २ बैल) आणि २० हजार रुपये किमतीचा विवो Y23 मोबाईल असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गोवंश अंदाजे ८ ते १२ वर्षे वयोगटातील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(घ)(ड)(छ)(ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ सुधारित २०१५ चे कलम ५(अ), ९, ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), ४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभाग चंद्रपूर पथकाने केली. अवैध गोवंश वाहतुकीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment