Ads

नागमंदिर चौकात रक्तरंजित थरार!


भद्रावती जावेद शेख : सकाळच्या वेळेस मोटारसायकलवरून जात असलेल्या ४० वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नागमंदिर चौक, भद्रावती येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.Bloody thrill at Nagmandir Chowk! Murder

मृतकाची ओळख उमदेव भावराव मेश्राम (वय ४०), रा. देऊरवाडा, भद्रावती, हल्ली मुक्काम शिवाजीनगर, प्रज्ञा वाचनालयाजवळ, भद्रावती अशी झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमदेव मेश्राम हे बुधवारी सकाळी सुमारे ७.३० वाजता घरून मोटारसायकलने निघाले होते. ते नागमंदिर चौकाजवळ पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात मानेवर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, हल्लेखोर कोण? हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली? याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

या थरारक हत्याकांडामुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment