Ads

गणपती विसर्जन मिरवणुकीत हत्यारबंद तरुण ताब्यात!

चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाच, गोलबाजार परिसरात धारदार हत्यार घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून लोखंडी सुरी आणि लोखंडी फायटर जप्त करण्यात आले.Armed youth detained during Ganpati immersion procession!

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात बंदोबस्त व पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोलबाजार परिसरात एक इसम धारदार हत्यार बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

माहितीची खातरजमा करून पथकाने पंचांसमक्ष कारवाई करत आर्यन किशोर पचारे (वय १९, रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ₹२०० किमतीची लोखंडी सुरी आणि ₹२०० किमतीचा लोखंडी फायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५(१-ब)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.

कारवाई : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment