तालुका प्रतिनिधी भद्रावती / जावेद शेख:
प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन भद्रावती यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाने शहर परिसरात गस्त घालत असताना अवैध विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. ही धडक कारवाई विठ्ठल मंदिर जवळील किल्ला वॉर्ड येथील भावना वानखेडे यांच्या घरी करण्यात आली.Bhadravati police take strong action against illegal sale of foreign liquor; Fortuner car and valuables worth over Rs 25 lakh seized
या कारवाईत २५,००,०००/- रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर कार (Toyota Fortuner) आणि ३६,१४०/- रुपये किमतीची अवैध विदेशी दारू असा एकूण २५,३६,१४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना व कारवाईचा तपशील:
दिनांक ०२/१०/२०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक शहर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,भावना वानखेडे ही तिच्याकडे काम करणाऱ्या चेतन पारेकर याच्या मदतीने स्वतःच्या टोयोटा फॉर्च्युनर कारचा व घराचा वापर करून अवैध विदेशी दारूचा साठा व विक्री करत आहे.
प्राप्त बातमीच्या आधारे विठ्ठल मंदिर जवळील किल्ला वॉर्ड येथील भावना वानखेडे यांच्या घरी पंचांसमक्ष छापा टाकून कारवाई करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच भावना वानखेडे हिच्याकडे काम करणारा संशयित चेतन पारेकर हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, तर भावना अशोक वानखेडे (वय ५५ वर्षे, रा. विठ्ठल मंदिराजवळ, किल्ला वार्ड, भद्रावती) हिला रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जागेवरच सूचनापत्र देऊन सोडून दिले.
पंचांसमक्ष घराची व अंगणात उभ्या असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारची झाडाझडती घेतली असता, त्यात विविध नामांकित कंपन्यांच्या अवैध विदेशी दारूचा मोठा साठा मिळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
वाहनाची जप्ती: गुन्ह्यात वापरलेली भावना वानखेडे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची FORCHUNER कार (क्रमांक MH 22 AM 8855, किंमत रु. २५,००,०००/-).
विदेशी दारूचा साठा: निरनिराळ्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या (एकूण किंमत रु. ३६,१४०/-).
एकूण जप्त मुद्देमाल: रु. २५,३६,१४०/-.
गुन्हा दाखल:
याप्रकरणी भावना वानखेडे व तिला विक्रीत मदत करणारा पाहिजे चेतन पारेकर या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंद्रे/२४५४, गोपाळ/ २५७९, देवानंद/ २३०७,अनुप/2293 पोलीस शिपाई मोनाली / १६७१ व रागिणी 6026, योगेश/ 1536,खुशाल/507,राठोड/2755 यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment