Ads

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांना निरोप

प्रशांत गेडाम सिंदेवाही -- 
सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
Farewell to Sub-Divisional Engineer Balu Shatgopanwar
 यावेळी षटगोपनवार साहेबांचा सहपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांतजी लोधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता संजय जैस्वाल व सहाय्यक अभियंता श्रेणी-१ शीतल दडमल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम यांनी केले, तर शाखा अभियंता लोचन वानखेडे यांनी आभार मानले.
यावेळी शाखा अभियंता रामटेके, प्रेस क्लब सिंदेवाहीचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रशांत गेडाम, तसेच कंत्राटदार आंबटकर, लाकडे, कोठेवार, पुप्परेड्डीवार, विशाल पटेल, मानापुरे, रफिक शेख, आदित्य गुरुबक्षानी व आदी कंत्राटदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिराजदार, हंगे, शेळके व शेंडे यांनी विशेष सहकार्य केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment