Ads

पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा




पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा

श्री.शा.बा. काळे
कार्यकारी अभियंता ,
चंद्रपूर पाटबंधारे विभाग आणि
श्री. रमाकांत लोधे जि.प. सदस्य तथा अध्यक्ष ,तालुका कॉंग्रेस
कमेटी सिंदेवाही यांच्या शुभहस्ते जलपूजा करून शुभारंभ

-दिनचर्या न्युज
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी मध्यम प्रकल्प हा सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकांसाठी सिंचनाच्या दृष्टीने जीवनदायी असा प्रकल्प म्हनून ओळखल्या जातो. घोडाझरी तलाव भरला की हमखास धानपिकांचे उत्पादन होईल ही खात्री शेतकऱ्यांना असते. म्हणून रोवणीच्या हंगामानंतर घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा सुटण्याची आतुरता शेतकऱ्यांना लागून असते.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्जन्यवृष्टी झाली नाही परंतु विभागाच्या नुसार घोडाझरी प्रकल्प १७.६ फूट( ७२.५९ % टक्के)इतका भरला आहे.परंतु यंदाच्या लहरी मान्सूनच्या नंतर पिकाला आवश्यक पाऊस न झाल्याने चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर घोडाझरी मध्यम प्रकल्पाचा कालवा सोडण्यात यावा आणि शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ मिळावा अशी अतिशय आग्रही भूमिका मांडून जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी संबधीत विभागाला सूचना केल्या होत्या .पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार आज घोडाझरी उपविभागीय कार्यालय सिंदेवाही येथे पाणी वितरण सल्लागार समिती आणि विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडून बैठकीत कालवा सोडण्याचा निर्णय घेऊन लगेच आज विधिवत पूजन करून कालवा सोडण्यात आला.
सदर बैठकीला आणि पूजनाच्या छोटेखानी कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता श्री. शा. बा. काळे साहेब तसेच जिल्हा पालकमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून जि.प.सदस्य तथा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री रमाकांत लोधे तसेच श्री. जुनोनकर साहेब शाखा अभियंता ,श्री. रणदिवे साहेब उपविभागीय अभियंता,कु. स्नेहल सावसाकडे शाखा अभियंता ,श्री. होमदेव मेश्राम आणि समितीचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.
कायम शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या हितार्थ निरंतर कार्य करणारे पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तळमळीने व आग्रही भूमिकेमुळे आज घोडाझरी मध्यम प्रकल्पाचा कालवा सोडण्यात आला. घोडाझरी प्रकल्पाचा कालवा सोडल्याने कोरोनाच्या संक्रमणकाळात आधीच नाना प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकरी बांधवांना नक्कीच सिंचनाच्या दृष्टीने असलेली चिंता दूर होऊन एक सुखदायक दिलासा मिळाला आहे.

दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment