Ads

धक्कादायक :- जिल्ह्यात 24 कोरोनाचा उद्रेक 1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू




गत 24 तासात 392 कोरोनामुक्त

धक्कादायक :- जिल्ह्यात 24 कोरोनाचा उद्रेक
1135 पॉझिटिव्ह ; सात मृत्यू

 आतापर्यंत 29,554 जणांची कोरोनावर मात
 ॲक्टीव पॉझिटिव्ह 8948

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 1135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment