ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठा शिरकाव,
कोसंबी गवळी गावात आढळले १६ कोरोना बाधित.
▪️ *पु्न्हा तपासणी शिबीराची आवश्यकता- संजय गजपुरे*
दिनचर्या न्युज :-
नागभीड तालुक्यात सध्या कोरोना चे थैमान वाढले असताना गावात आलेल्या तापाच्या साथी मध्ये दोन जण घरघुती उपचार करीत दगावल्या मुळे गावकऱ्यांनी गावात कोरोना तपासणी टेस्टिंग कॅम्प लावण्याची मागणी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे केली असता याची दखल घेत जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी लागलीच नागभीड च्या संवर्ग विकास अधिकारी भस्मे मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी यांच्याशी संपर्क साधत गावातील आपबीती कथन करीत कोरोना टेस्टिंग कॅम्प लावण्याची मागणी केली..
ही मागणी लक्षात घेता तालुका आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नागभीड कोरोना सेन्टर ची मदत घेत गावात आज सोमवार दि.१९ एप्रिल रोजी कोसंबी गवळी येथे कॅम्प लावला.. या कॅम्प पूर्वी आरोग्य विभाग व जि.प.सदस्य यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत मार्फत गावात कोविद बद्दल जनजागृती करण्यात आली तसेच आदल्या दिवशी मुनारी देण्यात आली... या सर्व कार्यात गावचे सरपंच दिलिप रंधये , उपसरपंच हेमणे, तलाठी चव्हाण ,ग्रामसेवक मुळणकर , कृउबास संचालक धनराज ढोक , माजी सरपंच मच्छिंद्र चनोडे, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे , आशावर्कर , आंगणवाडी सेविका , या सर्वांनी सहभाग घेतला याला उत्तम प्रतिसाद मिळाला..
आज या कॅम्प मध्ये लक्षणे असलेल्या ६५ नागरिकांनी तपासणी केली असता त्यापैकी १६ नागरिकांचे कोरोना अहवाल हे सकारात्मक
आले... या सर्व रुग्णांना नागभीड येथील कोरोना केअर सेन्टर ला भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
गावखेड्यात सर्वत्र अशी कोरोना सदृश्य तापाची साथ सुरू असताना कोसंबी गवळी या गावातील नागरिकांनी स्वतः या कॅम्प ची मागणी जि.प.सदस्य संजयजी गजपुरे यांच्याकडे केली व आरोग्य विभागाने त्यांना योग्य साथ देत योग्य वेळी योग्य निदान
करीत कोरोना साखळी खंडित करण्याचे मोठे कार्य केले आहे..
वेळेअभावी अजुनही आज अनेक नागरिकांची तपासणी न झाल्याने व कोरोनासदृष रुग्ण गावात असल्याने पुन्हा एकदा विशेष तपासणी शिबिराची आवश्यकता असल्याचे माहिती उपसरपंच हेमणे यांनी दिली आहे. जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी त्वरीत पुन्हा विशेष तपासणी शिबीर लावण्याची मागणी केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गाव,राजकीय लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्यामध्ये योग्य समन्वय दिसून आलेला आहे.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment