Ads

राज्य शासनाचे कडक निर्बंध लावण्याचे आदेश, विषाणुचा वाढता प्रभाव





राज्य शासनाचे कडक निर्बंध लावण्याचे आदेश, विषाणुचा वाढता प्रभाव


“ ब्रेक द चेन " अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना
आज रात्रौ 8 वाजतापासून होणार लागू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात "ब्रेक दि चेन (BREAK THE CHAIN) अंतर्गत संदर्भ क्र. 14 चे आदेशान्वये कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्रात काही ठरावीक बाबीस दि. 30 एप्रिल 2021 पावेतो प्रतिबंध करुन कडक निर्बध लावण्याबाबतचे आदेश निर्गमीत केलेले असल्याने, राज्य शासनाकडील उक्त आदेश व त्यानुषंगाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशातील संपुर्ण तरतूदी/ कडक निबंध चंद्रपूर जिल्हयातील कार्यक्षेत्रात संदर्भ क्र. 15 चे आदेशान्वये दिनांक 30 एप्रिल 2021 पावेतो यथास्थिती लागु करण्यात आलेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भ क्र. 16 चे आदेशान्वये, संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावात अधिक वाढ होत असल्याने संदर्भ क्र. 14 चे आदेशान्वये लावण्यात आलेले कडक/प्रतिबंधात्मक निबंधामध्ये अंशत: सुधारणा करण्यात आलेले आहे व सदर सुधारीत निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करण्यास सुचीत केलेले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात यथास्थिती लागु करीत आहे.
अ) कार्यालय उपस्थिती :
अ) राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. तथापी कोव्हीड-19 संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात येत आहे. इतर शासकीय कार्यालयांच्या बाबतीत अधिक उपस्थितीकरीता संबंधित कार्यालय प्रमुख यांनी स्थानिक आपत्ती प्राधिकरणाची परवानगी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा.
ब) राज्य शासनाकडील “ब्रेक दि चेन" अंतर्गत निर्गमीत दि. 13.04.2021 रोजीच्या आदेशातील परिच्छेद-5 मध्ये नमूद असलेली इतर कार्यालये (अत्यावश्यक सेवेत नसलेले) 15 टक्के कर्मचारी किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल त्या क्षमतेने कार्यरत राहु शकतील.
क) राज्य शासनाकडील “ ब्रेक दि चेन " अंतर्गत निर्गमीत दि. 13.04.2021 रोजीच्या आदेशातील परिच्छेद-2 मध्ये नमूद असलेली अत्यावश्यक सेवेतील कार्यालये कमीत-कमी कर्मचारी किंवा 50 टक्के कर्मचारी या मर्यादेत सुरु राहतील. प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा पुरविणा-या कर्मचा-यांची संख्या आवश्यकतेनुसार 100 टक्के पर्यंत कार्यालय प्रमुखांव्दारे वाढविली जाऊ शकेल.
ब) लग्न समारंभ :
लग्न समारंभ 25 व्यक्तींच्या उपस्थितीत फक्त एकाच हॉलमध्ये, 2 तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. या नियमांचे भंग करणा-या कोणत्याही कुटूंबाला, हॉल मालक / चालकास व इतर संबंधितास रुपये 50,000/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच असे समारंभ ज्या जागेत होत असतील त्या जागेवर कोव्हीड-19 संबंधीची अधिसूचना लागू असेपर्यंत बंदी घालण्यात येईल.

क) खाजगी प्रवासी वाहतूक :
अ) खाजगी प्रवासी वाहतूक (बसेस वगळता) फक्त अत्यावश्यक सेवा व वैध कारणांसाठीच केवळ वाहन चालक व 50 टक्के प्रवाशी क्षमतेने सुरु राहतील. तथापी सदर वाहतूक आंतरजिल्हा किंवा जिल्हयांतर्गत होणे अपेक्षीत नसून शहरापुरतीच मर्यादीत असणे अपेक्षीत आहे. आंतरजिल्हा किंवा जिल्हयांतर्गत प्रवास केवळ अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय निकडीचे कारण तसेच अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच करता येईल. सदर नियमांचे भंग करणा-यांवर रुपये 10,000/- इतका दंड आकारण्यात येईल.
ब) खाजगी बसेसमध्ये एकून आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल.
क) खाजगी बसेस आंतरजिल्हा किंवा जिल्हयांतर्गत प्रवासाकरीता खालील बंधने पाळतील :
• खाजगी बसेस वाहतूकदारांना शहरात जास्तीत-जास्त दोन थांबे घेता येईल. सदर थाब्यांची
माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांना द्यावी.
• खाजगी बसेसव्दारा प्रवास करणारा प्रवाशी गंतव्य ठिकाणी उतरताच, प्रवाशीच्या हातावर 14 दिवस होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा. सदर शिक्का खाजगी बसेस वाहतूकदार यांनी स्वत: बनवून घ्यावे.
1 सर्व प्रवाशांचे प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे. यादरम्यान एखाद्या प्रवाश्यांना लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ कोव्हीड केअर सेंटर किंवा हॉस्पीटल मध्ये पाठविण्यात यावे.
2 खाजगी बसेसब्दारा प्रवास करुन येणा-या प्रवाशांनी तात्काळ स्वत:ची तपासणी करुन घेण्याबाबत खाजगी बसेस वाहतूकदार यांनी प्रवाशांच्या निदर्शनास आणून द्यावे.
3 उपरोक्त नियमांचे प्रथमत: भंग करणा-या खाजगी बस वाहतूकदार यांचेवर रुपये 10,000/इतका दंड आकारण्यात येईल, वारंवार नियमांचे भंग होत असल्यास सदर खाजगी बस वाहतूकदार यांचा परवाना कोव्हीड-19 संबंधीची अधिसूचना लागू असेपर्यंत रद्द करण्यात येईल.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक :
अ) राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील बसेसव्दारा 50 टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल.
ब) आंतरजिल्हा किंवा जिल्हयांतर्गत लांब पल्ल्यांच्या रेल्वे किंवा बस खालील बंधने पाळतील :
1) स्थानिक रेल्वे प्रशासन अधिकारी/एस.टी. बस अधिकारी यांनी त्यांचेकडील प्रवाशांची माहिती स्थानिक प्रशासनाचे नोडल अधिकारी यांना पुरवावी. नोडल अधिकारी यांनी त्यांचे स्क्रिनींग बाबत पुढील कार्यवाही करावी.
2) प्रवास करणारा प्रवाशी गंतव्य ठिकाणी उतरताच, प्रवाशीच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा. सर्व प्रवाशांचे प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे. यादरम्यान एखाद्या प्रवाश्यांना लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ कोव्हीड केअर सेंटर किंवा हॉस्पीटल मध्ये पाठविण्यात यावे.
3) प्रवास करुन येणा-या प्रवाशांनी तात्काळ स्वत:ची तपासणी करुन घेण्याबाबत बसेस वाहतूकदार यांनी प्रवाशांच्या निदर्शनास आणून द्यावे.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी करावी.
सदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दिनांक 22.04.2021 चे रात्री 08.00 वाजेपासून ते दिनांक 01.05.2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागु राहतील असे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अजय गुल्हाने यांनी आदेशान्वये कळविले आहे.

दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment