जिल्ह्यातील नाभिक बांधवांवर प्रशासनाचा कुराघात, सर्व व्यवसाय सुरू मात्र नाभिक व्यवसाय बंद!
*नागपूर जिल्यातील सर्व संघटनाचे दुकानें शुरु करण्याकरिता एकमत*
*उद्यापासून सलून व्यवसाय शुरु करणार. सर्व संघटन यांनी केले एकमत*
दिनचर्या न्युज :-
नागपूर प्रतिनिधी :-
आज दी.1 जुन रोजी प्रसिद्धी पत्रक व प्रशासनाचे माध्यमातून असे सांगण्यात आले की सर्व दुकानें व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत चालू ठेवण्यात येणारे आहे. फक्त सलून व ब्युटीपार्लर बंद राहतील.
नाभिक समाज अनेक दिवसापासून निवेदने देऊन देवून थकला उपासमाऱ्या शुरु झाल्या. घरी पैसा नाही, दवाखान्यात परिवाराला कसे घेऊन जावे, दुकानाचे भाडे कसे द्यावे, वीजबिल कसे द्यावे, घरी पोट कसे भरावे शासन जगू देत नाही. हा प्रकार वर्षभराचे वर चालू असतानी या समाजात तंगी पोटी अनेक आत्महत्या झाल्या पैशाभावी घरी भांडण तंटे, बिमारी ला उधाण आले. सर्व संघटनांनी प्रशासन ते राजकीय प्रतिनिधी पर्यंत निवेदने व प्रत्येक्ष रित्या एरझरा मारुंमारून थकून गेली फक्त आश्वसने मिळाली. नाभिक सेवा ही अत्यवश्यक सेवा असून सुद्धा प्रत्येक्ष रित्या या समाजावर कुराघात करण्यात येत आहे. या समजवर कोणाचेही दयारूपी छत्र राहिले नाही. व आज समाज आपल्या पोटापाण्याच्या मजबुरी पोटी शासन निर्णयला डावलून स्वतः असुरक्षित होऊन कायद्याचं उल्लन्घन करण्यास मजबूर झालाय. एक तर आता प्रशासनाने आम्हास अनुमती द्यावी नाही दिली तरी आम्ही आता आपली दुकानें शुरु करू असा निर्णय नागपूर येथील सर्व संघटनांनी श्री नगाजी महाराज सांस्कृतीक भवन सेंट्रल एव्यन्यू रोड येथे घेण्यात आला.
आम्ही असेही उपाशी मरत आहो. प्रशासनाची आमच्यावर कसल्याही प्रकारची दयादृष्टी नाही, आमच्या समाजातील झालेल्या आत्महत्या परिवाराला मदत नाही, सहानुभूती चे एक पाऊल सुद्धा शासनानी आमच्याप्रति उचलले नाही म्हणून नाभिक संघटनांनी शासनाप्रति घोर नाराजी व्यक्त केली आहे. याप्रसंगी झालेल्या समाज मिटिंग मध्ये सर्व संघटनातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपाध्यक्ष श्री .बंडूजी राऊत, नाभिक एकता मंच संस्थापक अध्यक्ष श्री.धनराज वलुकार , म.ना. म.पूर्व विदर्भ अध्यक्ष श्री. श्याम आस्करकर, म.ना. म. जिल्हा अध्यक्ष सतिश तलवारकर, नाभिक एकता मंच ग्रा. जिल्हा अध्यक्ष श्री.विलाश वाटकर, नाभिक एकता मंच शहर अध्यक्ष श्री. अमोल आंबूलकर, म.ना. म. जिल्हा अध्यक्ष श्री. गणपतजी चौधरी, नाभिक युवा शक्ती शहर अध्यक्ष श्री. गुलाब इंगळे यांची व सर्व संघटनेचे पदाधीकारी गण यांची उपस्थीती होती.
0 comments:
Post a Comment