Ads

गडचांदूर शहराचा सि टी सर्वेनतंर अनेकांच्या होणार जेल वा-या ?





गडचांदूर शहराचा सि टी सर्वेनतंर अनेकांच्या होणार जेल वा-या?

दिनचर्या न्युज
गडचांदूर :-
ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रूपांतर झालेल्या गडचांदूर शहराचा सिटी सर्वे करण्यासाठी समिती दाखल झाली असून त्या समितीने प्रामाणिक पणे सर्वे केल्यास गडचांदूरातील आदिवासीच्या पळित
जमिनी अत्यल्प दरात विकत घेऊन त्यावर प्लाँट पाडून विकणा-या स्वयंभू समाजसेवक, करोडो रुपये कमावणाऱ्या दलालाचा पडदा पास झाल्यास आदिवासीच्या जमीन हडप करणाऱ्या दलाला कारागृहाची हवा झाल्यास राहणार नाही.
हि  समिती पहिल्यांदा गडचांदूर  शहरातील वाढत्या लोकसंख्येचा  सर्वे करणार असून  त्यात वाढिव क्षेत्रातील नवीन वस्त्या, वाढीव क्षेत्रफळ, शहराची लोक संख्या याचे  सर्वे होणार असल्याचे विश्वासनीय सुत्राकडून माहिती मिळाली आहे.  सध्यास्थितीत हा सर्वे माणिकगड पासून सुरू झाले आहे.  येणाऱ्या एखाद्या आठवड्यात  हा सर्वे गडचांदूर शहरामध्ये सुरू होईल अशी  अधिकृत माहिती आहे. 
गडचांदूर शहराच्या निर्मितीनंतर प्रथमच अशा पद्धतीच्या सर्वे होत असून या सर्वे मध्ये अनेक काळे-पिवळे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आदिवासींच्या जमिनी अत्यल्प दरात घेऊन त्यातून करोडो रुपये कमवून गब्बर झालेले या शहरांमध्ये वसलेले आहे. "आमचे कुणीच काही बिघडवू शकत नाही." या तोऱ्यात असलेल्या अशाच काही गब्बरांना या सिटी सर्वे नंतर कारागृहात जावे लागेल, हे मात्र निश्चित आहे. प्रशासनाला नवीन झालेल्या वस्त्यांची माहितीही देण्यात आल्याची चर्चा आहे. 
नव्यानेच नेता झालेला एक युवक या खरेदी विक्री व्यवहारात अग्रस्थानी आहे. नेत्यांसोबत आपली ओळखी दाखवून शहरांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर स्तरावरील नेता अशी आपली प्रतिमा उभारले. याने त्याचे स्वतःचे लेआउट गडचांदूर शहरामध्ये बसलेले असल्याचे गडचंदुरात चर्चा सुरू आहे. 

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment