सहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप
दिनचर्या न्युज :
चंद्रपूर :-
मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय चंद्रपूर श्री. सुनिल जांभुळे यांची सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमरावती येथे बदली झाल्याने मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचारी व जिल्हयातील मत्स्यव्यवसायीक यांचे कडून त्यांना दि. २३ ऑगस्ट रोजी ह्रदयस्पर्शी निरोप देण्यात आला. श्री. जांभुळे यांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत पदावर कार्यरत असताना चंद्रपूर जिल्हयातील मत्स्यव्यवसायाच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने चांदा ते बांदा तलाव तेथे मासोळी सारख्या उलेखनीय योजना यशस्वीपणे राबवून जिल्हयाला मत्स्यव्यवसायसमध्ये अग्रेसर ठेवले. कार्यक्रमातील उपस्थितानी जांभुळे साहेब मनमिळावू कार्यक्षम अशा स्वभावाचे होते अशा भावना आपल्या भाषणातून प्रकट केल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री. बळकटे व आभार प्रदर्शन श्रीमती भोसले यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे श्री पवार, प्रशासकीय अधिकारी, नागपूर कार्यालय हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये श्री नरड, श्री कत्रोजवार, श्री दरेकर, श्री डोंगरे, श्रीमती रोहनकर, श्री चंदनबटवे, श्री वैद्य हे कर्मचारी व मत्स्यव्यावसायिक उपस्थित होते.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment