स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार या पुरस्काराने उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या ३५ कर्मचाऱ्याचा गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सत्कार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात उत्साहाने साजरा करण्यात आला. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारयांनी ध्वजास मानवंदना अर्पण केली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार या पुरस्काराने उत्कृष्ठ सेवा देणारया ३५ कर्मचारयांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्रीमती.संध्या चिवंडे(चंद्रपूर प्रविभाग), कारर्यकारी अभियंता श्री. उदय फरासखानेवाला , सहा. उपमुख्य औदयेागिक संबंध अधिकारी श्री. योगेश गोरे, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. राकेश बेारीवार हे प्रामुख्याने उपस्थित हेाते. तसेच इतर अधिकारी व कर्मचारी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.
महावितरण मध्ये काम करतांना, महावितरणचे तांत्रिक कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत उन, वारा, पावसात काम करीत असतात व उल्लेखनिय काम करून महावितरणची मान उंचावण्याचे प्रयत्न करीत असतात. अशा गुणवंत कर्मचायांच्या सेवेची दखल घेत साधून चंद्रपूर परिमंडलामधील १७ कर्मचारयांचा व गडचिरोली मंडलातील १८, कर्मचारयांचा गुणवंत कामगार या पुरस्काराने, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत कर्मचारयांच्या या सत्कारप्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी कर्मचारयांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यातही आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम अश्याचप्रकारे भविष्यात सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण वेळेत करणे, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागणे व काम करतांना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याचेही आवाहनही केले.
दरवर्षी चंद्रपुर परिमंडळाअंतर्गत सन २०२० २१ या वर्षात उत्कृष्ट कार्य बजाविणारे तांत्रीक कर्मचारी उदा. यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचारी यांचा दरवर्षी ”१ मे कामगार दिनी“ चा गौरव करण्यात येतो. परंतु करोनाच्या सावटात ते १ मे २१ ला ते श्क्य होवू न शकल्याने १५ ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
चंद्रपुर विभाग
श्री. मोतीराम सदाशिव नागोसे, वरिष्ठ यंत्रचालक,श्री. महेश रमेश गुजरकर,त्ंात्रज्ञ,श्री. निलेश पुंडलिक चैधरी,त्ंात्रज्ञ, श्री. देविदास खवसे, त्ंात्रज्ञ,श्री. सोमेश्वर मधुकर करकाडे,त्ंात्रज्ञ,श्री. महारुद्र लिंबाजी भंागे,त्ंात्रज्ञ
बल्लारशाह विभाग
श्री. रमेश प्रभाकर सातपुते यंत्रचालक श्री. दिलीप भाऊराव चाफले,त्रज्ञश्री. अमोल पुरुषोत्तम रोडे,वरिष्ठ त्ंात्रज्ञ श्री. रविंद्र महादेव जांभुळकर,वरिष्ठ त्ंात्रज्ञ,श्रीमती अनिता सचिन शिडाम,त्ंात्रज्ञ,श्रीमती सय्यद सुलताना सय्यद नबी,वरिष्ठ त्ंात्रज्ञ, श्री. राहुल रमेश संगीडवार, वरिष्ठ त्ंात्रज्ञ
वरोरा विभाग
श्री. हरिशचंद्र श्रीहरी दोडके,यंत्रचालक,श्री. धनराज तुळशिराम कुळमेथे,वरिष्ठ त्ंात्रज्ञ,श्री. अमीत हरीदास कांबळ,े त्ंात्रज्ञ श्री. महादेव कवडु सातपुते,त्ंात्रज्ञ
0 comments:
Post a Comment