Ads

जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर व गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचार शासनाच्या विविध योजनांमधून कसे विनामूल्य कसे करायचे या साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबीर!





जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर व गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचार शासनाच्या विविध योजनांमधून कसे विनामूल्य कसे करायचे या साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबीर!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या सभागृहात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी वैद्यकीय सहायता कक्ष" तर्फे जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर व गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचार शासनाच्या विविध योजनांमधून कसे विनामूल्य करून देता येते याबाबत मार्गदर्शन शिबिर या वैद्यकीय सहायता कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख श्री.गजानन साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष श्री.मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,शहर अध्यक्ष श्री.राजीव कक्कड,महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,शहर महिला अध्यक्ष सौ.ज्योतीताई रंगारी,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष श्री.महादेवराव पिदुरकर,युवकचे शहर अध्यक्ष श्री प्रदीप रत्नपारखी,युवतीच्या माजी शहर अध्यक्ष सौ.प्रज्ञा पाटील,श्री.सुधाकर कातकर यांच्या उपस्थित संपन्न झाले.*
*विविध प्रकारच्या आजारांवर चंद्रपूर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे नागपूर,वर्धा,व राज्यातील कोणकोणत्या दवाखान्यांमध्ये शासनाच्या विविध योजना,ज्यात 'महात्मा फुले जन आरोग्य योजना', 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना', लहान बालकांच्या दुर्धर आजारांवर उपचारासाठी असलेली योजना,त्याचप्रमाणे विविध समाजसेवी संस्था,ज्यात सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट,शिर्डी संस्थान ट्रस्ट, टाटा ट्रस्ट इत्यादी इत्यादी तर्फे आर्थिक मदत मिळण्याबाबतची माहिती,तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी करावयाचा अर्जबाबत माहिती, अश्या या सर्व योजनांची माहिती,त्यांच्या कडून आर्थिक मदत कशी मिळवायची,त्यासाठी कोणकोणती प्रक्रिया पूर्ण करायची यावर विस्तृत मार्गदर्शन MJPJAY, PMJAY योजनेचे प्रमुख डॉ.सुमित भगत, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी श्री.मडावी आणि महाराष्ट्रातील दानशूर असलेल्या विविध समाजसेवी संस्था याबद्दलची संपूर्ण माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमांतून "महाराष्ट्र राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.गजानन साबळे" यांनी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समजाविण्यात आली.येत्या १० दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात "वैद्यकीय सहायता कक्षाची चमू निवडण्यात येईल" व त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अश्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना विनामूल्य उपचार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे हे वैद्यकीय आरोग्य पथक स्थापन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी याप्रसंगी दिली,आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.मोरेश्वर टेमुर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाने सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण समाजसेवेच्या कार्याबद्दल पक्षाचे आभार व्यक्त केले,व कार्यकर्त्यांना या विषयाला गांभीर्याने घेवून गरजुंच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आवाहन केले.या गंभीर व अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरील मार्गदर्शन शिबिरास जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री.राजीव कक्कड यांनी केले.

दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment