सदर शिबीरात हृदयरोग , शल्य चिकित्सा , बालरोग , प्रसुती व स्त्रिरोग , कान - नाक - घसा , दंत चिकित्सा इत्यादी तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुण देण्यात येणार आहेत . शिबीरात रुग्णाची तपासणी करून ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची आवश्यता आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या ३ दिवसात ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे तज्ञ डॉक्टर करणार आहेत . ज्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात होणे शक्य नाही अशा रुग्णांना वैद्यकिय महाविद्यालय , चंद्रपुर येथे संदर्भीत करुन सेवा देण्यात येणार आहे . जे रुग्ण औषधोपचाराने बरे होणार आहेत त्यांना औषधोपचार करण्यात येणार आहे . सदर शिबीराचे उद्घाटन मा . ना . विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा,तसेच प्रमुख पाहूणे मा . अशोक नेते खासदार चिमुर - गडचिरोली निर्वाचन क्षेत्र , त्याचप्रमाणे विशेष अथिती मा . अजय गुल्हाने जिल्हाधिकारी , चंद्रपुर तसेच मा . डॉ . संजय जैयस्वाल , उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपुर हे उपस्थित राहणार आहेत . या शिबीराचे जनजागरण ब्रम्हपुरी तालुक्यातील ५ प्रा.आ.केंद्र व ३० आरोग्य उपकेंद्र यांचे अंतर्गत करण्यात आलेले असून सदर शिबीर यशस्वी करण्याकरीता ग्रा.रु.चे वैद्यकिय अधिक्षक मा . डॉ . सुभाष खिल्लारे तसेच या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्री . डॉ . विलास दुधपचारे व त्यांचे अधिनस्त असणारे सर्व प्रा . आ . केंद्राचे व ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरीचे सर्व आरोग्य कर्मचारी हे अथक परिश्रम घेत आहेत . करीता ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेला विनंती आहे की , सदर शिबीराचा गरजूनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा .
Home
chandrapur
ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे तालुका स्तरीय आरोग्य व दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment