Ads

कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

Flag hoisting program held at Kamgar Kalyan Kendra Urjanagar
ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर येथे देशाच्या ७३ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मा नरेंद्र रहाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ सदस्य तथा सेवानिवृत्त उपमुख्य कार्यपालन अधिकारी परशुराम धांडे , प्रमुख अतिथी कामगार नेते नरेंद्र रहाटे,राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य खजानिस तथा जिल्हाध्यक्ष गडचिरोली देवराव कोंडेकर, चंद्रपूर गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्याध्यक्ष अख्तर खान, गुणवंत कामगार शिवाजी नागरे ,जेष्ठ गुरुदेव सेवक भीमराव कुळमेथे यांची उपस्थिती होती.मान्यवरांनी प्रजाकसत्ताक दिनानिमित्य आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत कामगार दिनकर मशाखत्री यांनी केले तर प्रास्ताविक व आभार कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक संजय वानोडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेकरीता केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे मॅडम,कविता सदाफळे,सुवर्णा उपरे यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment