ब्रम्हपुरी :-आनंदी जीवन जगायचे असेल तर मन आणि शरीर निरोगी असणे अत्यावश्यक आहे. 'निरोगी आयुष्याचे मंत्र सूर्यनमस्काराचे तंत्र' या ब्रिदवाक्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दिनांक १ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान प्रत्येक शासकीय तथा सामाजिक संस्थांनी सामुहिक सूर्यनमस्कार संकल्प अभियान राबविण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे.*
*सूर्यनमस्कार संकल्प अभियानातंर्गत नुकतेच ने.ही.महाविद्यालयाच्या प्रांगणात एन.सी.सी.,राष्ट्रीय सेवा योजना , पतंजली योग समिती व नगर परिषद ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य, ने.ही.महाविद्यालय, ब्रम्हपूरी, प्रा आनंद भोयर, पर्यवेक्षक, ने ही कनिष्ठ महाविद्यालय, ब्रमहापुरी भगवान पालकर जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती, भगवान कन्नाके तालुका प्रभारी भारत स्वाभिमान , दिलिप जुमडे महामंत्री पतंजली योग समिती ,भालचंद्र नाकाडे, रूद्राक्ष राऊत , नगर परिषद कर्मचारी वृंद नीतीश रगड़े, परवीन काले, तनवीर खान पठान, पीयूष चुर्हे, प्रशांत नंदनवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लेप्टनंट प्रा.गिल मॅडम यांनी केले आनि आभार लेफ़्टिनेंट प्रा अभिजीत परकरवार यानी केले. नरेश ठक्कर तालुका प्रभारी पतंजली योग समिती ब्रम्हपुरी यांनी देशभक्तीपर गीतगायन करून* *कार्यक्रमाची सुरूवात केली. मंत्रोच्चारासह सूर्यनमस्काराचे प्रात्याक्षिक पालकर , कन्नाके,ठक्कर , रूद्राक्ष ,जुमडे , नाकाडे यांनी कॅडेट्स समोर करून दाखविले. तद्वतच* *सूर्यनमस्काराचे लाभ व विद्यार्थी जीवनावर होणारा प्रभाव याबाबत प्रा. कोकोडे सर यांनी महत्व विशद केले.*
*कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लेप्टनंट प्रा.अभिजीत परकरवार ,ने.ही. महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद,शारीरीक शिक्षण व क्रिडा विभाग ने.ही.महाविद्यालय , पतंजली योग समिती ब्रम्हपुरी , एन.सी.सी. यूनिट ने ही महाविद्यालय ब्रम्हपूरी ,राष्ट्रिय सेवा योजना विभाग या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम् व शांतीपाठाने करण्यात आला.*
0 comments:
Post a Comment