Ads

“बिना लिलाव रेती घाटावर तस्करांचा डल्ला

भद्रावती तालुका प्रतिनिधी/जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील अवैद्य रेती तस्करांनी उच्छाद मांडलाय बिना लिलाव असलेल्या रेतीघाटावर रेती तस्करांनी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रेती तस्करी चालू आहे विशेष म्हणजे मुख्य मार्गावरून रेती तस्करी होत असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई करत नसल्याने तस्करांना प्रशासनाला मूक संमती आहे का असा संतप्त सवाल भद्रावती तालुक्यातील नागरिक करीत आहे. 
“Raid by smugglers on the sand ghat without auction.”भद्रावती तालुक्यातील खासगी व शासकीय बांधकामातील वेग घेतला आहे ज्या घाटातून अधिकृत लीलाव झालेले नाही त्या घाटात रेती च्या पुरवठा सर्रास पणे सुरू आहे रेती तस्करांची हिम्मत वाढल्याने रेती तस्करी जोमात सुरू आहे मात्र प्रशासन कोमात दिसल्याचे चित्र दिसत आहे महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या सुस्त कार भारामुळे रेती तस्कर मालामाल होत आहे तर दुसरीकडे शासनाच्या करोडोच्या महसूल बुडत आहे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर अवैद्य रेतीचे साठे दिसून येत आहे तस्करांच्या या वाढत्या शीर जोडीमुळे गौणखणी जाची लूट होत आहे व पर्यावरणाच्या ऱ्हास होत आहे. अवैध  खनिजाचे लूटमारीचे प्रकरण तालुक्यात चर्चेच्या विषय  आहे केवळ नावापूर्ती कारवाई न करता या तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालने गरजेचे झाले आहे तस्कराविरुद्ध कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरतआहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment